Breaking News

खुनाच्या गुन्ह्यातील फरार महिला आरोपी जेरबंद


जामखेड / प्रतिनिधी
छाया बबन भोसले हिला जामखेड पोलिसांनी आठवडे बाजारातून शिताफीने केली अटक केली. आष्टी पोलीस स्टेशनला दीड वर्षापुर्वी दाखल गुन्हा रजिस्टर नं 273/17 भादंवी 302 मधील पोलीसांनी हवी असलेली फरार महिला आरोपी जामखेडच्या आठवडी बाजारात आली असल्याची माहिती जामखेड पोलिस स्टेशनला गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार जामखेडचे पो. नि. पांडुरंग पवार यांनी आष्टी पोलिस स्टेशनशी संपर्क करून सत्यता पडताळून घेतली. त्यानंतर पो. नि. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. साने, पो.कॉ. जाधव, पो.कॉ. कुरेशी, पो.कॉ. शेळके, महिला पो.कॉ. व्यवहारे यांच्या पथकाने सापळा लावून शिताफीने सदर महिला आरोपीला ताब्यात घेवून अटक केली.