Breaking News

नगरपालिकेने हाती घेतलेले नवीन प्रकल्प साध्य होतील : जिल्हाधिकारी


नगर । प्रतिनिधी - देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानात चांगले काम आहे. ओढया-नाल्यावर खोलीकरण व रुंदीकरण करुन पाणलोट क्षेत्र निर्माण केले असून दोन्ही बाजूला बांबुचे रोपण करण्यात येणार असल्याने भविष्यकाळात त्याचा निश्चित फायदा होईल. तसेच नगरपालिकेचे हाती घेतलेले नवीन प्रकल्प साध्य होतील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपालिकेत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सदिच्छा भेट देवून नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानातील विविध प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी नगरपालिका सभागृहात द्विवेदी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, प्रांताधिकारी शैलेश चव्हाण, तहसीलदार अनिल दौंडे, मुख्याधिकारी नानासाहेब महानवार, नगरसेवक आण्णासाहेब चोथे, सचिन ढुस, भारत शेटे, तुषार शेटे, ज्ञानेश्वर वाणी, भिमराज मुसमाडे, अमोल कदम, सचिन सरोदे आदी उपस्थित होते.