Breaking News

भालाफेकपटू नीरज चोप्रा होणार ध्वजवाहक


नवी दिल्ली/प्रतिनिधी

गोल्ड कोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील यशानंतर सर्व भारतीय खेळाडूंना वेध लागले आहेत ते आशियाई खेळांचे. इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेमबांग येथे १८आॅगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाईमध्ये भारतीय खेळाडू पदके जिंकण्यास उत्सुक आहेत. या वर्षीच्या आशियाई स्पर्धेमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राभारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा हा उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक म्हणून दिसणार आहे. भारतीय आॅलम्पिक संघाचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी ही घोषणाकेली.

नीरज चोप्राने २०१६ मध्ये आयएएफ २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. २० वर्षांचा नीरज राष्टकुल चॅम्पियन असून गेल्या महिन्यातफिनलॅन्डमधील सावो येथे त्याने सुवर्ण पदक जिंकले. २०१७ च्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतही त्याने ८५.२३ मीटर भालाफेक करीत सुवर्ण पटकविले होते. नीरजची भालाफेकस्पर्धा २७ आॅगस्टला असली तरी ध्वजवाहक बनल्यामुळे १७ आॅगस्ट रोजी इंडोनेशीयामध्ये दाखल होणार आहे.

आशियाई स्पर्धेचा ध्वजवाहक म्हणून निवड झाल्याने मी फार रोमांचित आहे. या मोठ्या स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व करणे सन्मानाची बाब आहे. मला ही बाब अचानकसमजल्यामुळे आनंद द्विगुणित झाला आहे. - नीरज चोप्रा,भालाफेकपटू