Breaking News

दुतीने रचला इतिहास; हिमा,अनसला राैप्यपदक


भारतीय संघाने रविवारी १८ व्या एशियन गेम्समधील अापली पदक जिंकण्याची माेहीम कायम ठेवली. भारताने स्पर्धेच्या अाठव्या दिवशी सात पदकांची कमाई केली. यामध्ये पाच राैप्यसह दाेन कांस्यपदकांचा समावेश अाहे. २२ वर्षीय महिला धावपटू दुती चंदने १०० मीटरमध्ये भारतासाठी एेतिहासिक यश संपादन केले. तिने तब्बल १९८६ नंतर भारतीय संघाला या स्पर्धेच्या १०० मीटरमध्ये राैप्यपदक मिळवून देण्याचा पराक्रम गाजवला.त्यामुळे अाता पी.टी. उषानंतर या गटात एशियन गेम्समध्ये पदक जिंकले. तसेच १८ वर्षीय धावपटू हिमा दास अाणि अनसने ४०० मीटरमध्ये राैप्यपदकाची कमाई केली. यासह भारताने अॅथलेटिक्समध्ये तीन राैप्यपदके पटकावली. लक्ष्मणन हा कांस्यपदकाचा मानकरी ठरला हाेता. मात्र, त्याला पंचांनी अपात्र घाेषित केले.