म्हाळसपिंपळगाव येथे आजपासून लक्ष्मीआई मातेचा यात्रौत्सव


चांदा (प्रतिनिधी) - नेवासा तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव येथे लक्ष्मीआई मातेचा यात्रौत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा यात्रा उत्सव आज मंगळवार 7 ऑगस्ट रोजी सुरु होत असून त्यामध्ये प्रथम लक्ष्मीआईची सकाळी पुजेचा धार्मिक कार्यक्रम होईल. दुपारी चार वाजता म्हाळसादेवीच्या पुजेचा धार्मिक कार्यक्रम होईल. नंतर म्हाळसादेवी मंदिरापासून लक्ष्मीआई मातेची गावातून सवाद्य मिरवणुकीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायं. 7 ते 9 यावेळेत श्रीहरी महाराज वाकचौरे (पुणे विद्यापीठ पदवीधर) आळंदी देवाची यांचा किर्तनाचा कार्यक्रम हनुमान मंदिर या ठिकाणी होईल. याप्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी महाराज (श्री क्षेत्र देवगड ) हे उपस्थित राहतील. रात्री 9 वाजता भाविकांसाठी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होईल. तरी सर्व ग्रामस्थांनी व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्थ ग्रामस्थ व यात्रौत्सव कमिटी म्हाळसपिंपळगाव यांनी केले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget