Breaking News

टिळकनगर व परिसरात बकरी ईद उत्साहात


टिळकनगर (प्रतिनिधी) - मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेली बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तालुक्यातील टिळकनगर, दत्तनगर, एकलहरे, रांजणखोल, खंडाळा तसेच संपूर्ण लगद असलेल्या वाड्यावस्त्यावरील मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत सदिच्छा भेट घेतली.
मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानली जाणारी बकरी ईद शांततेत साजरी करण्यात आली. टिळकनगर येथील इदगाह मैदान येथे 9 वाजता ईद उल अज्हा ही सामुहिक नमाज पठण करण्यात आले. संपूर्ण जगात शांती नांदावी, हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये एकोपा व जातीय सलोखा टिकून राहण्यासह यंदा पाणी-पाऊस समाधानकारक व्हावा, अशी प्रार्थना सामूहिक नमाज पठणातून करण्यात आली. जामा मशिदीचे मौलाना गुलाम जिलानी सहाब यांनी नमाज पढविली. तत्पूर्वी अल जामीअतूल कादरीया मदरसेचे प्रमुख मौलाना ओवेस रिझवी, दत्तनगरचे मौलाना काफ़िजुल रहेमान यांनी ईदचे महत्त्व विषद केले. ईद त्याग व बलिदानाची शिकवण देणारी आहे, असे त्यांनी सांगितले. या ईदच्या दिवशी हजरत इब्राहिम अले अस्सलाम यांनी दिलेल्या कुरबानीची परंपरा ही आज कायम असून बुधवारी झालेली ही बकदी ईद संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या बकरी ईदीला मुुुस्लिम धर्मामध्ये मोठे स्थान आहे.