Breaking News

सिद्धिविनायक गणेश मंदिराची १ रोजी कलश स्थापना


सोनई प्रतिनिधी

सोनई- कांगोणी रस्त्यालगतच्या हनुमानवाडी परिसरातील सिद्धिविनायक चौकात एक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या सिद्धिविनायक गणेश मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त येत्या शनिवारी {दि. १} सकाळी ९ ते ११ यावेळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिरावर कलश स्थापना आणि कासव मूर्ती स्थापना केली जाणार आहे. यावेळी कीर्तन आणि प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारपासून {दि. ३० } या कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. शुक्रवारी {दि. ३१} संध्याकाळी ९ ते ११ यावेळेत ब्रम्हकुमारी उषादीदी यांचे प्रवचन होणार आहे. यासाठी कन्हैयालाल चंगेडिया, दिनकर येळवंडे, जालिंद्र शेटे, प्रा. राजेंद्र झिने, प्रशांत धनवटे, शरद शेटे, राजेंद्र फोके, पंढरीनाथ शेगर आदी प्रयत्नशील आहेत.