Breaking News

बिलाचे पैसे मागितल्याच्या रागातून मारहाण


राहुरी विशेष प्रतिनिधी.

चायनिजच्या बिलाचे पैसे मागितल्याच्या रागातून येथील हाॅटेल कामगारांना पाच ते सहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी राहुल भारत जगधने यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील भागिरथीबाई शाळेसमोरील नगरपालिकेच्या काॅम्प्लेक्समध्ये असलेल्या एका चायनिज हाॅटेलात हा प्रकार घडला. राजू कल्हापुरे, दिपक नवले आदींसह पाच जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यापैकी कोणालाही अद्याप अटक करण्यात आली नाही. मात्र पोलीस संबंधितांच्या लवकरच मुसक्या आवळणार आहे.