Breaking News

जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ

प्रवरा औद्योगिक ,शैक्षणिक, आरोग्य आणि सांस्कृतिक समुह पुरस्कृत पद्मश्री विखे पाटील कला,, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालच्या वतीने सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ११८ व्य जयंती निमित्त शनिवार दि. २५ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी २:३० वा. जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला असून ९१ व्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि राज्याचे विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला असल्याची माहिती विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. तसेच या कार्यक्रमासाठी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील आणि परिषदेच्या अध्यक्षा ना सौ. शालिनीताई विखे पाटील आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील मा. खासदार बाळासाहेब विखे पाटील बहुउद्देशीय सभागृहामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी विद्यार्थी ,पालक आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्तित राहावे असे आवाहन पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रदीप दिघे यांनी केले आहे.