Breaking News

राशीनला संविधान सन्मान रॅली


कुळधरण / प्रतिनिधी

दिल्ली येथील जंतरमंतर येथे समाजकंटकांनी संविधान जाळल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राशीन शाखेच्यावतीने संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले.भिमराव साळवे यांनी या रॅलीचे नेतृत्व केले.

आंबेडकर नगर येथे संविधान सन्मान रॅलीची सुरूवात करण्यात आली. राशीनच्या मुख्य बाजार पेठेतुन महात्मा ज्योतीराव फुले चौकात सविंधानाचे पुजन करून वाचन करण्यात आले. रॅली दरम्यान संविधानाप्रती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देण्यात आल्या. संविधानाचे दहन करणार्‍या समाजकंटकांना फाशी देण्याची मागणी प्रभारी मंडलाधिकारी श्रीरंग अनारसे व पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली.

या सविंधान सन्मान रॅलीला संभाजी ब्रिगेड, महात्मा फुले मंच, शिवसेना, भारतीय टायगर फोर्स यांनी पाठिंबा देण्यात आला. यावेळी रविंद्र दामोदरे, माजी सरपंच रामकिसन साळवे, तात्यासाहेब माने, गणेश कदम, अतुल साळवे, राजेंद्र ढावरे, हर्षल आढाव, सचिन साळवे, मोहसीन काझी, दीपक थोरात, सुलोचना दोशी, मायादेवी मोरे, किरण पोटफोडेंसह युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.