Breaking News

भास्करगिरी महाराजांच्या हस्ते झाडाला राखी बांधून वृक्षारोपण


नेवासा / प्रतिनिधी
तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभ करून व झाडाला राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. ज्याप्रमाणे प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करतो, त्याचप्रमाणे पर्यावरण व संवर्धन रक्षणासाठी वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली.
याप्रसंगी देवगड पार्कींग परिसरात मोठ्या प्रमाणात विविध सावलीचे व फळाचे झाडे लावण्यात आली. गंगापूर तालुक्यातील नबाबपूरवाडीच्या सेवाधारी भक्त मंडळ यांनी वृक्षलागवडीसाठी योगदान दिले.
याप्रसंगी पंढरपूरचे हभप दादा महाराज, मुळा साखर कारखाना संचालक बाळासाहेब पाटील, बजरंग विधाते, मोहन आहेर, राम विधाते, प्रशांत निपुगे, संतोष शिंदे, सुभाष दिघे, पोपट साठे, एकनाथ मोरे, चंदू जाधव आदी उपस्थित होते.