Breaking News

शहीद पोचीराम कांबळे यांना अभिवादन


कोपरगाव : शहरातील टिळकनगर भागातील भीमगर्जना तरुण मंडळ व युथ रिपब्लीकन पक्षाच्यावतीने शहीद पोचीराम कांबळे स्मृतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मातंग समाजातील शहीद कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतर आंदोलनात बलिदान दिले होते. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामांतरासाठी आपले आयुष्य अर्पण केले होते. यावेळी नितीन शिंदे, रविंद्र जगताप, विशाल शिंदे, राजेंद्र घोडेराव, दिपक वानखेडे, योगेश शिंदे, नानासाहेब मोरे, गणेश पवार, अनिल वैरागळ आदी उपस्थित होते.