Breaking News

श्री सद्गुरू गोदड महाराजांचा जन्मसोहळा उत्साहात


कर्जत / प्रतिनिधी 

शहराचे ग्रामदैवत संत श्री सद्गुरु गोदड महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा सोमवारी रोजी कर्जतमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सालाबादप्रमाणे कर्जतचे ग्रामदैवत संत श्री सद्गुरु गोदड महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा महाराजांच्या जन्मस्थळी व समाधीस्थळी स्वतंत्रपणे पार पडला. सकाळी 6 वाजता गोदड महाराज मंदिरामध्ये गावकरी, मानकरी, पुजारी आणि 21 दाम्पत्याच्या हस्ते सद्गुरु श्री गोदड महाराजाच्या समाधीवर अभिषेक करण्यात आला. यानंतर दिवसभर तालुक्यातील विविध भजनी मंडळाचा भजनांचा कार्यक्रम पार पडला. महाराजांचे जन्मस्थळी उभारलेल्या ध्यानमंदिरात हभप दयानंद महाराज कोरेगावकर यांचे कीर्तन झाले तर, श्री गोदड महाराज यांच्या समाधीस्थळ मंदिराच्या ठिकाणी हभप ज्ञानदेव माऊली पठाडे महाराज यांचे किर्तन झाले. पंचक्रोशीतील नागरिकांनी घरासमोर सड़ा, रांगोळी, तोरण लावत गुढी उभारून सदगुरु गोदड महाराज यांच्या जन्माचे स्वागत केले. जन्मोत्सवानिमित्त दोन्ही ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.