Breaking News

आरक्षण निर्णय लवकर घ्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील - वाघ


   
नेवासा (प्रतिनिधी) - मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नेवासा शहरात रविवार पासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. सोमवार दि. 6 ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस असून आरक्षण मिळेपर्यंत हे ठिय्या आंदोलन चालूच ठेवणार असून आरक्षणाचा निर्णय लवकर घ्यावा अन्यथा सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागेल असा इशारा यावेळी ठिय्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाऊसाहेब वाघ यांनी दिला आहे.आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी दुसर्‍या दिवशी मुळाचे माजी उपाध्यक्ष जबाजी फटके, भाजपचे दिलीप साबरे, पी.आर.जाधव, महमंदभाई टेलर, रम्हूभाई पठाण, मच्छिंद्र हापसे, आबासाहेब फाटके, चांगदेव मोटे, फारुकभाई दारुवाले, प्रकाश उंदरे, सीताराम झिने,शिवाजी सोनवणे, गोवर्धन झीने, हिंदू एकता आंदोलनचे जे.एम.वाकचौरे, नगरसेवक रणजित सोनवणे, राजेंद्र मापारी, भारत डोकडे यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठींबा दिला.