‘पालखेड’चे पाणी बंधाऱ्यांना सोडा : काळे


कोपरगाव प्रतिनिधी

तालुक्यातील पावसाची सरासरी घटल्यामुळे पूर्व भागातील पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न भर पावसाळ्यातही बिकट होत चालला आहे. अशा परिस्थितीत या गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पूर्व भागातील कोळ नदीवरील बंधारे आणि पाझर तलाव पालखेड कालव्याद्वारे पाण्याने भरून द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

ते म्हणाले, मागील काही दिवसांपासून पावसाने तालुक्यात उघडीप दिली आहे. परिणामी पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे तालुक्यातील पूर्व भागात नागरिकांच्या पिण्याच्या तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट झालेला आहे. पालखेड कालव्याचे पाणी जर कोळ नदीला सोडले गेले तर कोळ नदीचे बंधारे व पाझर तलाव भरल्यास पूर्व भागातील शिरसगाव, सावळगाव, तीळवणी, आपेगाव, उककडगाव, कासली, पढेगाव, ओगदी, करंजी, अंचलगाव आदी गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget