Breaking News

श्री मार्कंडेय देवस्थान व पद्मशाली युवाशक्तीच्या वतीने नारळी पोर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम


नगर - येथील गांधी मैदानात श्री मार्कंडेय महामुनी मंदिरात नगर शहर पद्मशाली युवाशक्तीच्या वतीने नारळी पोर्णिमा उत्सवानिमित्त सामाजिक उपक्रमांबरोबरच धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रम साजरे करणार आहे. तरी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या सर्व कार्यक्रमांची शोभा वाढवावी, असे आहवान श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्ट व पद्मशाली युवाशक्ती, नगर शहराच्या वतीने करण्यात आले आहे.
शनिवार दि. 25 ऑगस्ट 2018 रोजी स. 8 वा. श्री. मार्कंडेय मंदिरात महाआरती, स.8.15 ते दु.3 वा. रक्तदान शिबीर व मोफत मधुमेह तपासणी, स.11 वाजता श्री मार्कंडेय संकुल, दातरंगे मळा येथे खा.दिलीप गांधी यांच्या हस्त वृक्षारोपण , दु.3 ते 5 वा. चित्रकला व रांगोळी स्पर्धा, सायं.6 ते 9 वा. डान्स व गु्रप डान्स स्पर्धा होणार आहे. या सर्व स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ डान्स स्पर्धा संपन्न झाल्यानंतर लगेच रात्री 9 वाजता होणार आहे.
रविवारी 26 ऑगस्ट 2018 रोजी स.7 वा. मार्कंडेय महामुनी रुद्राभिषेक, स.8 वा. होमहवन, स.9 वा. यज्ञोपवित (जानवे) धारण, स.11 वा. रक्षाबंधन होऊन दुपारी 3 वा. श्री मार्कंडेय महामुनी पालखी मिरवणुक रथोत्सव, व सायं.9 वाजता श्री मार्कंडेय महामुनींची महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
पद्मशाली युवाशक्तीच्या वतीने मिरवणुकीत सहभागी होणार्‍या भगिनींसाठी लकी ड्रॉ सोडतीने पैठणी साडी भेट देण्याचा उपक्रम राबविला जाईल. या लकी ड्रॉ साठी अम्मा गुंडू साडी यांच्याकडून 11 पैठणी साडी, प्रेरणा डिझाईनर याकडून 10 ड्रेस मटेरियल, सखी लेडिज कलेक्शन यांच्याकडून 5 लेडिज कुर्तीज् देण्यात येणार आहे. तरी समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहुन शोभा वाढवावी.
श्री मार्कंडेय महानुमी पालखी मिरवणुक रथोत्सव मिरवणुक मार्ग - श्री मार्कंडेय मंदिर, पापय्या गल्ली, राधाकृष्ण मित्र मंडळ चौक, चौपाटी कांरजा, दिल्लीगेट, संबोधी शाळा, नवरंग व्यायाम शाळा, शितळा देवी मंदिर, काष्टगणेश चौक, नेतासुभाष चौक, तेलीखुंट चौक, एम.जी.रोड, भिंगारवाला चौक, अर्बन बॅक रोड मार्गे पुन्हा मार्कंडेय मंदिरात या मिरवणुकीची सांगता होईल. याची समाजबांधवांनी दखल घ्यावी.