महाराष्ट्रामध्ये २ नवीन केंद्रीय विद्यालय; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील वाशिम आणि परभणी जिल्ह्यात दोन नवीन केंद्रीय विद्यालयांना केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली असून महाराष्ट्रातील 2 केंद्रीय विद्यालयांसह सहा राज्यात एकूण 13 केंद्रीय विद्यालयांना आज मंजुरी मिळाली. महाराष्ट्रातील होऊ घातलेले केंद्रीय विद्यालय विदर्भातील वाशिम आणि मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात असणार आहे. यासह मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालयास मंजुरी मिळाली आहे.

देशभरात 12 लाख विद्यार्थी केंद्रीय विद्यालयातून शिक्षण घेत आहेत. 13 नवीन शाळांमुळे 13 हजारपेक्षा अधिक विद्यार्थांना याचा लाभ होणार आहे.मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने मार्च-2017 मध्ये ‘आव्हान प्रणाली’च्या अंर्तगत अंदाजित 1160 कोटी रूपये मंजूर केले आहेत. याअंतर्गत 50 नवीन केंद्रीय विद्यालये स्थापन करण्यास मंजुरी दिली होती. हे विद्यालय त्याच ठिकाणी उघडण्यात येतील जेथे प्रायोजक संस्था केंद्रीय विद्यालयांच्या मानांकनानुसार पात्र ठरतील. तसेच, ‘प्रथम या, प्रथम घ्या’ या तत्वावर जमीन देतील. यासह अस्थायी भवनाची व्यवस्था करण्यासाठी पुढे येतील. यानुसार केंद्रीय विद्यालय संघटनेने प्रशासकीय आदेशान्वये आवश्यक नियम पूर्ण करीत असलेल्या ठिकाणी नवीन केंद्रीय विद्यालय उघडण्याचे प्रशासनिक आदेश जारी करण्यात आले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget