Breaking News

टपरीचालकास २० हजारांचा गंडा


राहुरी : लाचलुचपत विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून दोन अज्ञात भामट्यांनी राहुरी फॅक्टरी येथील पानटपरी चालकास २० हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अशिष सुभाष संसारे {रा. अंबिकानगर} यांनी फिर्याद दिली. आरोपी लवकरच जेरबंद करू, अशी ग्वाही पोलिस निरिक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली. आपण लाचलुचपत विभागाचे अधिकारी असून पानटपरीची झडती घ्यायची आहे, असे या भामट्याने सांगितले. त्यातील एकाने टपरीत प्रवेश करुन टपरीची झडती घेतली. मात्र त्या झडतीमध्ये २० हजाराची रक्कम लंपास करुन पोबारा केला. पोलीस नाईक साळवे घटनेचा तपास करत आहेत.