ज्येष्ठ आयुर्वेद चिकित्सक डॉ.प्रभाकर पवार यांचा गुरुपुजन सोहळा संपन्न


नगर - सालाबाद प्रमाणे याही वर्षी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचे सल्लागार व प्रतिथयश आयुर्वेद चिकित्सक डॉ.प्रभाकर पवार यांचा गुरुपुजनसोहळा नगर येथील आयुर्वेद परिचय केंद्रामध्ये उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून विद्यार्थी वर्ग व आयुर्वेद चिकित्सक उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत धन्वंतरी पूजन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. याप्रसंगी आरोग्य भारती संस्थेचे राष्ट्रीय सचिव डॉ.सुनिलजोशी, डॉ.राजा ठाकूर, डॉ.अजित फुंदे, डॉ.लक्ष्मीकांत कोर्टिकर, डॉ.मंदार भणगे, डॉ.संदिप फटांगरे, डॉ.सारंग पाटील, डॉ.मंगेश काळे, डॉ.रमेश राजगुरु,डॉ.भानुदास दौंड, डॉ.सिद्धेश्‍वर वैद्य, आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रथम सत्रात डॉ.पवार यांनी विसर्प या रोगा संदर्भाने वेगळ्याप्रकारे कसा विचार करता येवू शकतो, या रोगाची तुलना कॅन्सरशी करता येईल का? आणि येतअसेल तर त्याची कारणे काय? त्यावर उपचार काय? यावर विवेचन करुन कॅन्सर रुग्णांचे काही फोटो व आयुर्वेद सूत्रांचा योग्य तो मिलाफ करुन माहितीपूर्णव्याख्यान दिले. याबरोबरच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्‍नांना समर्पक उत्तरे देऊन शंकांचे समाधान केले.
दुपारच्या सत्रामध्ये वैद्य मंदार भणगे यांनी आयुर्वेद वनौषधी उद्यानात लागवड केलेल्या अत्यंत दुर्मिळ वनस्पती दाखवून त्यांच्या उपयोगासहअभ्यासपूर्ण माहिती दिली. यानंतर डॉ.पवार यांच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय व्यवसायातील आधुनिक उपचाराने बर्‍या न झालेल्या रोगांचा आयुर्वेदाच्याउपचार पद्धतीने उपचार करुन अशा रुग्णांचे अनुभव स्लाईड शो द्वारे सादर केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.सुनिल जोशी मनोगतात म्हणाले, हा गुरुपुजन सोहळ्याचा कार्यक्रम महाराष्ट्रातील आयुर्वेद चिकित्सकांना व विद्यार्थ्यांनामार्गदर्शक ठरावा असा आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम मी प्रथमच अनुभवत असून, शैक्षणिकदृष्ट्या तज्ञ वैद्य बनण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकताआहे.
यावेळी डॉ.लक्ष्मीकांत कोर्टिकर, वैद्य विलास जाधव, वैद्य किरण मंत्री, वैद्य कु.पूर्वा भारदे यांनी डॉ.पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन त्यांच्यामार्गदर्शनाने आमच्या जीवनातील अमुलाग्र बदलाचे विश्‍लेषण केले.
शेवटी सर्वांनी डॉ. प्रभाकर पवार व सौ.अलका पवार यांचे गुरुपुूजन करुन आशिर्वाद घेतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैद्य सुजित ठाकूर, वैद्य विनोद ववैद्य ज्योती चोपडे, वैद्य महेश मुळे, वैद्य मधुसूदन कुर्‍हाडे, वैद्य स्वप्नील पाटील, वैद्य प्रदीप सुरासे, वैद्य विनायक पवार, वैद्य सूर्यक़ांत राऊत,वैद्य रुपाली नाथ आदिंनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन वैद्य पुर्वा भारदे यांनी केले तर आभार वैद्य नितीन गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास नाशिक,नंदूरबार, जळगांव, धुळे , पुणे आदिेंसह जिल्ह्यातील आयुर्वेद तज्ञ उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget