Breaking News

अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले वंदनमुंबई : भारतरत्न माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचे अस्थिकलश मुंबईत आणण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर उपस्थित राहून अस्थी कलशाला वंदन केले.

यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण खासदार रावसाहेब दानवे, आमदार आशिष शेलार, प्रसाद लाड आदी उपस्थित होते.