Breaking News

सनातन बंदीसंदर्भात ठोस पुरावे नाही, केसरकरांचा यू-टर्न


सनातन बंदीबाबत राज्य सरकार खरंच गंभीर आहे का? असा प्रश्न आता समोर येतोय. सनातन बंदीचा प्रस्ताव नव्यानं केंद्राकडे पाठवल्याचा दावा करणाऱ्या गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला होता पण आता घुमजाव केलंय. सध्या तपास अगदी प्राथमिक स्तरावर असल्यानं बंदीचा निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका दीपक केसरकरांनी घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होतं.

डॉ.दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गींच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर आता राज्यभरात हिंदुत्ववाद्याचं अटकसत्र सुरू आहे.सनातन संस्थेची संबंधीत संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरे, वैभव राऊत, शरद कळसकरला ताब्यात घेण्यात आलंय. या प्रकरणी अखेर सरकारने सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केंद्राकडे याबद्दल प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती दिली होती.

सनातनवरच्या बंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे अशी माहिती खुद्द गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी दिलीय. आधीच्या प्रस्तावात त्रुटी असल्यानं नव्या प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याचं केसरकर यांनी स्पष्ट केलंय होतं. पण आज अचानक केसरकर यांनी घूमजाव केलंय.