Breaking News

जवळेश्‍वर रथयात्रेनिमित्त भव्य कुस्ती हंगामा


जामखेड प्रतिनिधी - तालुक्यातील जवळा येथील जवळेश्‍वर रथयात्रेनिमित्त भव्य कुस्ती हंगामा भरविण्यात आला. यामध्ये राज्यभरातील मल्लांनी सहभाग घेतला. शेवटचा मानाचा जवळेश्‍वर केसरी किताब जवळा गावचा पैलवान राहूल आव्हाड आणि जेऊरचा (ता.करमाळा) पैलवान किरण माने यांच्यात विभागून देण्यात आला.
जवळेश्‍वर रथयात्रेनिमित्त दरवर्षी यात्रेनंतर भव्य कुस्ती हगामा भरविला जातो.यामध्ये राज्यभरातील मल्ल सहभागी होतात. जवळेश्‍वर मंदिर प्रांगणात झालेल्या कुस्ती हगाम्यास उपमहाराष्ट्र केसरी बबनराव काशीद , राष्ट्रकुल स्पर्धेतील सुर्वणपदक विजेता राहूल आवारे याचे वडील पैलवान बाळासाहेब आवारे , महाराष्ट्र चॅम्पीयन पै. श्रीधर मुळे , पै. भारत जाधव , पै.आदम शेख, अफसर जाधव , पै. राजेंद्र कोंडलकर , पै. देवा कोळेकर , पै.धनंजय शिंदे, पै.राजु शेख 
,यांच्यासह सभापती सुभाष आव्हाड , ज्योती क्रांती पतसंस्थेचे अध्यक्ष आजीनाथ हजारे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय काशिद , युवक कार्यकर्ते अक्षय शिंदे , जवळा सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष प्रदिप पाटील ,सरपंच अनिल पवार , उपसरपंच गौतम कोल्हे , संतराम सूळ , प्रदिप दळवी ,प्रशांत पाटील , राजेंद्र राऊत, किरण वर्पे , उमेश रोडे , शरद हजारे , काकासाहेब वाळुंजकर, प्रशांत शिंदे , रणजित पाटील, बबन ठकाण ,पंडीत पवार , तान्हाजी पवार , असलम शेख, अशोक पठाडे , भाऊसाहेब खरात,पंडीत खाडे, बंडु कोल्हे ,यांच्यासह मोठ्या संख्येने कुस्ती रसीक उपस्थित होते.

जवळेश्‍वर मंदिर प्रांगणात दुपारी चार वाजता सुरू झालेले कुस्ती मैदान रात्री आठ वाजेपर्यंत तब्बल चार तास चालले. यामध्ये राज्यभरातील साधारण तिनशे मल्लांनी भाग घेतला. या कुस्ती यशस्वी पार पाडण्यासाठी युवक कार्यकर्ते पै.संजय आव्हाड व पै. बाबा महारनवर यांनी महत्वाची भूमिका पार पाडतानाच पंच म्हणून काम पाहिले. या कुस्ती स्पर्धेदरम्यान प्रसिध्द कुस्ती निवेदक राजेंद्र देवकाते यांनी सुत्रसंचलन करताना कुस्तीचा इतिहास उलगडून प्रेक्षकांना सांगताना केलेले निवेदन उपस्थितांना चांगलेच भावले.