Breaking News

अखंड हरीनाम सप्ताहामध्ये चैताली काळेंची सेवा


कोपरगाव / ता. प्रतिनिधी

१७० वर्षाची ऐतिहासिक, धार्मिक परंपरा असलेल्या प. पु. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांचा अखंड हरीनाम सप्ताह श्री. क्षेत्र शिर्डी येथे सुरु आहे. या सप्ताह सोहळ्यास जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी भेट देत सरालाबेटाचे उत्तराधिकारी महंत रामगिरी महाराज यांचे आशीर्वाद घेवून प्रवचनाचा लाभ घेतला. दरम्यान, काळे यांनी सप्ताहस्थळी बुंदीचा महाप्रसाद तयार करण्याचे काम सुरु असलेल्या स्वयंपाकगृहामध्ये बुंदी सुकविण्याची सेवा केली.

यावेळी त्यांनी संपूर्ण स्वयंपाक गृहामध्ये सेवा करीत असलेल्या महिला भगिनींशी हितगुज साधली. रोटरी क्लबच्यावतीने पुरविण्यात येत असलेल्या मोफत वैद्यकीय सेवेची माहिती घेतली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, डॉ. एकनाथ गोंदकर, उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, नगरसेवक अभयराजे शेळके, जगन्नाथ गोंदकर, विजय जगताप, सुधाकर शिंदे, गोपीनाथ गोंदकर, सप्ताह कमिटीचे अध्यक्ष तुकाराम गोंदकर, कमलाकर कोते, संदीप पारख, शिवाजीराजे गोंदकर, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, महाप्रसाद स्वयंपाक गृहाचे प्रमुख आचारी सुरेश टेके आदी उपस्थित होते.