Breaking News

नेपाळमध्ये अडकले मानसरोवर यात्रेकरू


काठमांडू : कैलाश मानसरोवर यात्रेवर जात असलेले जवळपास १७५ भारतीय भाविक नेपाळच्या हुमला जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अडकून पडले आहेत. खराब वातावरणामुळे विमानांचे उड्डाण थांबविण्यात आले आहे; परंतु स्थिती नियंत्रणात असून, हवामान ठीक झाल्यानंतर सर्व भाविकांना सुरक्षित बाहेर काढले जाईल, अशी माहिती भारतीय दूतावासाचे प्रवक्ते रोशन लेपचा यांनी दिली आहे. खराब वातावरणामुळे हुमलाच्या सिमिकोट भागात जवळपास २०० भाविक अडकलेले आहेत. गत तीन दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व नियमित स्थानिक विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत..