नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : चार संशयितांची सुटका


पुणे : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी करून सोडून देण्यात आलंय. विशाल खुंटवाल, महेश इंदलकर,प्रसाद देशपांडे आणि अवधूत पैठणकर या चार ही संशयितांची चौकशी करून एटीएस पथकाने संध्याकाळी सोडून दिलेय.

दरम्यान, कालच्या नालासोपारा कारवाईनंतर आज एटीएसनं राज्यभर धाडसत्र सुरू केलंय. या प्रकरणी पुण्यातून सुधन्वा गोंधळेकरला ताब्यात घेतल्यानंतर, त्याच्याशी संबंधित असल्याच्या संशयावरून पुणे एटीएसनं आणखी दोन जणांना कोंढवा आणि पर्वती इथून ताब्यात घेतलंय. त्यातील एका संशयिताचं नाव जाधव असल्याचं समजतंय. या प्रकरणी राज्यभरातून आणखी काहीजणांना एटीएस ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

नालासोपारा स्फोटके प्रकरणात एटीएसने आपली कारवाई अधिक तीव्र करत राज्यभरातून आणखी १२ जणांना ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण शुक्रवारी अटक केलेल्या तीन प्रमुख आरोपींच्या नियमित संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget