पिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान

स्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही शिस्त मोडल्या गेल्याचा एक व्हिडियो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील काळभोर चौकात, महापौर राहुल जाधवांनी अत्यंत घाईने ध्वजारोहन केलं आणि चक्क ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत राष्ट्रगान केलं. हा प्रकार ध्वज आचार संहितेचा भंग तर आहेच, शिवाय राष्ट्रीय कार्यक्रमादरम्यान घडलेला अवमान ही आहे. त्यामुळे महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडवे आणि अशी सलामी देणारे सत्ताधारी भाजपचे पक्ष नेते एकनाथ पवार यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जातेय.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget