Breaking News

मॉब लिंचिंगसारखी घटना गंभीर गुन्हा : पंतप्रधान गेल्या वर्षात एक कोटी रोजगार उपलब्ध करून दिल्याचा मोदी यांचा दावा

नवी दिल्ली/प्रतिनिधी : जमावाकडून होणारे हत्येचे गुन्हे हे गंभीर स्वरुपाचे असून, कोणतेही कारण असो मॉब लिंचिंगसारखी घटना गंभीर गुन्हा आहे. या अशाप्रकारच्या घटना समोर येत असल्याने अंत्यत दु:ख होत आहे. ते थांबवणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले. एका मुलाखतीत जमावगटांकडून वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, कोणतीही व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत, कायदा हातात घेऊन हिंसा करू शकत नाही. विरोधकांनी या मुद्यावरुन राजकारण करण्यापेक्षा समाजात एकात्मकता कशी राहील याकडे लक्ष द्यावे. तसेच, मी तसेच, माझ्या पक्षाने नेहमीच जमावगटांकडून झालेल्या आत्याचारांबाबत आमची भूमिका स्पष्ट केली आहे. अशा प्रकारच्या प्रत्येक घटनांची नोंद माझ्याजवळ आहे. अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांचे राजकारण करुन जे विरोधी पक्ष आपला फायदा करुन घेताना दिसत आहेत, त्या लोकांची हिंसक वृत्ती आणि विकृत मानसिकता स्पष्ट यामधून दिसून येते. अशा शब्दात मोदींनी विरोधकांवर टीका केली.

राज्य सरकारने यांसारख्या घटना कशा नियंत्रित करता येऊ शकतील, याकडे लक्ष देऊन यावर उपाययोजना करायला हव्यात. कोणताही धर्म, जातीतील व्यक्ती असो त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे. या मुद्यावर नव्या शिफारसी देण्यासाठी केंद्रीय गृहसचिवांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय सरकारने गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांची समितीही स्थापना केली आहे. मंत्र्यांची ही समिती शिफारशींवर लक्ष देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर आता त्यांनी मागील वर्षात एक कोटी बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला.