Breaking News

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी संघाची चाचपडत सुरवात; भारत २ बाद २०
बर्मिंगहॅम वृत्तसंस्था/12
लॉर्ड्स कसोटीमध्ये भारतीय संघ बॅकफूटवर पडलेलं आहे. पहिला डाव इंग्लंडने ३९६ धावांवर घोषित केला.  दुसऱ्या डावात भारताची सुरवात समाधानकारक झाली नाही. भारताचे सलामीवीर थोड्याचवेळात माघारी परतले. जेम्स अँडरसनने मुरली विजय आणि लोकेश राहुलला माघारी धाडत भारताच्या डावाला खिंडार पाडलं. मुरली विजय शून्यावर तर लोकेश राहुल १० धावांवर बाद झाला.शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा चेतेश्वर पुजारा ७ वर आणि अजिंक्य रहाणे ५ धावांवर खेळत होते.
या दोन्ही खेळाडूंकडूनच अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.कारण संयमाची खेळी भारताला नामुष्कीतून  बाहेर काढू शकते.
हा कसोटी सामना अनिर्णित राखायचा असल्यास उरलेल्या दिवसाच्या खेळात संयमीपणे फलंदाजी करणं भारतीय फलंदाजांसाठी क्रमप्राप्त झालेलं आहे. उरलेल्या दोन दिवसांच्या खेळात लॉर्ड्सच्या मैदानावर पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या असलेल्या ढगाळ हवामानाचा फायदा घेऊन इंग्लंडचे गोलंदाज भारताचा संघ पुन्हा एकदा गारद करुन डावाने विजय मिळवण्याचा प्रयत्न करु शकतात.