Breaking News

अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार


डोंबिवली : सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत 'फ्रेंडशिप डे'ला कलंक लावणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघा विश्वासघातकी मित्रांनी १६ वर्षीय अल्पवयीन मैत्रिणीवर 'फ्रेंडशिप डे'च्या दिवशी आळीपाळीने बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची प्रतीक शेलार (२२) व भूषण केदारे (१८) या नराधम मित्रांसोबत मैत्री होती. 'फ्रेंडशिप डे'च्या दिवशी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास शेलार आणि केदारे यांनी दुसऱ्या मित्रांकडे जाण्याच्या बहाण्याने तिला दुचाकीवरून बसवून ठाकुर्ली परिसरात नेले. त्यानंतर खंबाळपाडा येथील ९० फूट रोडवर एका दुकानात नेऊन तिच्यावर दोघांनी आळीपाळीने बलात्कार केला. दरम्यानच्या काळात मुलगी घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्या नराधम मित्रांनी तिला घराजवळ आणून सोडले.