सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई.

नक्षलवाद्यांकडून 16 मोठी शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत. कोंता आणि गोलापल्ली पोलीस स्टेशनच्या हद्दींमध्ये हा परिसर येतो. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोलापल्ली आणि कॉन्टा पोलीस ठाण्यातील सुमारे 100 नक्षलवाद्यांची बैठक सुरू होती. माहिती अधिकार्‍यांच्या माहितीनंतर सुरक्षा दलांनी एक रणनीती आखली आणि नक्षलवाद्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आले आहे. याबद्दल अजुनही सर्चिंग आपरेशन सुरू आहे. हाती लागलेल्या माहितीनुसार, 4 आयईडी आणि 16 शस्त्रे घटनास्थळावरून जप्त करण्यात आली आहेत. छत्तीसगडमध्ये या वर्षाची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget