Breaking News

टेलच्या भागातील शेतकर्‍यांना पाणी देण्याची मागणी


शेवगाव प्रतिनिधी - शासनाने सन 2005 मध्ये पाणी वापरसंस्था स्थापन केल्या. प्रत्येक संस्थांना पाण्याचा कोटा ठरवून दिला. पाथर्डी व शेवगाव हा टेलचा भाग असून कायम हा भाग दुष्काळी आहे. आम्हाला पाटबंधारे खात्याकडून आतापर्यंत कधीच पाणी व्यवस्थित मिळाले नाही, त्यामुळे आमचे उसाची पिके जळाली आहेत. मुळा धरणाच्या कॅनॉलवर व वितरीकांवर असणारे सर्व अनाधिकृत पाईप काढून टाकावेत व टेलच्या भागात असणार्‍य सर्व शेतकर्‍यांना पाणी 
द्यावे अशी मागणी शिवाजी भाऊराव भिसे, सदस्य कालवा सल्लगार समिती, मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर यांनी एका निवेदनाव्दारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की हेड टू टेल कॅनॉलवर अनाधिकृत 6, 5, 4, 3, 2 इंची पाईपलाईन हेडच्या शेतकर्‍यांनी केल्या आहेत. याबाबत अनेकदा ग्रामसभेचे ठराव देवूनही अनाधिकृत पाईप लाईन काढण्याची विनंती पत्राव्दारे केली असतांना पाटबंधारे अभियंता याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. ते साधा पत्राचा खुलासा ही करू इच्छित नाही. हेडच्या लोकांना चार चार वेळा पाणी रोटेशन काळात मिळते असा आरोप ही या लेखी निवेदनाद्वारे शिवाजी भिसे यांनी केला आहे. त्यामुळे आमची उभी असलेली उसाची पिके जळाली असल्याचा आरोप भिसे यांनी केला आहे. उसाची उभी पिके जळाली असल्यामुळे बँकाचे कर्ज कसे फेडायचे? असा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर पडला आहे. त्यामुळे टेलच्या भागाला पाणी कसे मिळेल यांची खबरदारी घ्यावी व शेतकर्‍यांना लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी भिसे यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती आमदार मोनिका राजळे, अधिक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण त्र्यंबकरोड नाशिक, कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर, उपविभागीय अभियंता अमरापूर , उप
विभागीय अभियंता कुकाणा, शाखाधिकारी पिंपळगाव यांना निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे ताराभाऊ लोढे व असंख्य शेतकरी उपस्थित होते.