Breaking News

‘भारत’ घडविणार्‍या ‘रत्नांचा’ अनोखा चित्रप्रवास...


चिंतामणी आर्ट गॅलरीत ‘भारतरत्न’ पुरस्कार प्राप्त देशप्रेमींच्या ‘पोट्रेट’ कलाकृती प्रदर्शनात चित्रकार रणजित थोरात यांचा अनोखा कलाविष्कार14 ऑगस्ट पासून नगर- काही तरी वेगळ, युनिक.. यू नो.. आऊट ऑफ द बॉक्स पाहिजे.. असा संवाद आपण नेहमी ऐकतो. अशा अनेक विचारांच्याचर्चांच्या घुसळनीतून एखादी नामी कल्पना क्लिक होते. त्यावर सखोल विचार केला जातो आणि ती प्रत्यक्षात आकारते. असाचं आरुंट ऑफद बॉक्स थिंकिंग साकारले आहे. नगरचे कलाकार रणजित थोरात यांनी भारत देशावर अखंड प्रेम करुन त्यासाठी अतुलनिय योगदान देणार्‍याआजपर्यंतच्या सुमारे 45 भारतरत्न पुरस्कार प्राप्त असामान्य रत्नांचे पोट्रेट चित्र अनोख्या पद्धतीने रणजित थोरात यांनी साकारले आहे. याअवर्णनिय चित्रकृतीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन चिंतामणी आर्ट गॅलरी एमआयडीसी, नगर येथे दि. 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वा. होणारअसल्याची माहिती संचालक चिन्मय सुकटनकर यांनी दिली.

‘भारतरत्न दी प्राईड ऑफ इंडिया’ या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे यांच्या हस्ते तसेच प्रसिद्धइतिहासतज्ञ व लेखक डॉ.संतोष खेडलेकर यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. रणजित थोरात यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपलीकला जोपासली असून, या प्रदर्शनाच्या माध्यमातून ‘भारतरत्न’ चित्रकृतींचा हा भारतातील पहिला अनोखा प्रयोग आहे. त्यांनी आजपर्यंतमहाराष्ट्रातील अनेक मान्यवरांच्या चित्रकृती साकारल्या असून, सातत्याने नाविण्यपूर्ण प्रयोग सुरु आहेत.

हे प्रदर्शन चिंतामणी आर्ट गॅलरीत 31 ऑगस्ट पर्यंत विनामुल्य खुले आहे. उद्घाटन समारंभाच्या 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वा.डॉ. संतोष खेडलेकर यांचे ‘भारत रत्नांचे देशाचे अमुल्य योगदान’ या विषयावर असामान्य रत्नांच्या कार्याचा वेध घेणारे व्याख्यान होणार आहे.या अनोख्या प्रदर्शनास नगरकरांनी आवर्जुन भेट द्यावी, असे आवाहन चिन्मय सुकटनकर यांनी केले आहे.