Breaking News

सामाजिक योजना राज्याला दिशादर्शक डॉ. विखे


प्रवरानगर प्रतिनिधी

राहता तालुक्यात मोफत अपघात विमा योजना, मोफत गॅस आणि आता प्रत्येक कुटुंबाला रेशनकार्ड मिळवून देण्याचा मानस आहे. या उपक्रमामुळे वंचित राहिलेल्‍या नागरिकांना सहा महिन्यांत रेशनकार्ड मिळवून देण्‍याचा प्रयत्न आहे. यातून शिर्डी मतदारसंघात सुरु केलेली सामाजिक योजना ही राज्याला दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे यांनी केले.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते डॉ. सुजय विखे यांच्या संकल्पनेतून वंचित कुटुंबाना रेशनकार्ड मिळवून देण्याचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. बाभळेश्वर येथे याकरिता ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम बेंद्रे होते. याप्रसंगी डॉ. विखे बोलत होते. अण्णासाहेब बेंद्रे, ज्ञानदेव म्हस्के, उपसभापती बबलू म्हस्के, आबा मोकाशी, मारूती गोरे, सरपंच राजेंद्र म्हस्के, संदीप लहारे, नायब तहसीलदार राहूल कोताडे, दादासाहेब म्हस्के, शंकरराव बेंद्रे, सुंदरबापु तुपे, मिनिनाथ म्‍हस्‍के, शहाजी कोकाटे, प्रमोद बनसोडे, समिर शेख, साहेबराव म्‍हस्‍के आदींसह कार्यकर्ते, ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने यावेळी उपस्थित होते.