Breaking News

हार्दिकची कपिल देवशी तुलना चुकीची-गावस्कर


मुंबई प्रतिनिधी

श्रीलंकाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताचा हार्दिक पांड्या याची तुलना कपिल देव याच्याशी करण्यात आली होती. या बाबत गावस्कर यांना मत विचारण्यात आले. त्यावेळीगावस्कर म्हणाले कि ही तुलना योग्य नाहीये. गेल्या काही दिवसांपासून भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याची तुलना कपिल देव याच्याशी करण्यात येत आहे.भारताचेदिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना गोलंदाजांचा कर्दनकाळ मानले जात असे. आपल्या पिढीतील एक सर्वोत्तम फलंदाज म्हणून त्याची ख्याती होती. जोएलगार्नर, मायकल होल्डिंग्स, गॅरी सोबर्स यासारख्या वेगवान गोलंदाजांचा गावस्कर यांनी धीराने सामना केला होता. तत्कालीन कर्णधार कपिल देव याचाही गावस्कर यांना पाठिंबाआणि सहाय्य मिळायचे. या आपल्या कर्णधाराची भारताच्या सध्याच्या संघात असलेल्या एका खेळाडूशी करण्यात आलेली तुलना गावस्कर यांना अजिबात रुचली नाही.