Breaking News

लोकप्रतिनिधींनी रथ यात्रेत सहभागी न होण्यासाठी निवेदन


कर्जत / प्रतिनिधी
कर्जत तालुका सकल मराठा समाजाचेवतीने कर्जत तहसील कार्यालयासमोर दि. 30 जुलै 2018 पासून मराठा आरक्षण व इतर न्याय मागण्यांसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.हे बेमुदत ठिय्या आंदोलन मराठा आरक्षण मिळेपावतो पुढे सुरु राहणार आहे. दरवर्षी रथोत्सवमध्ये कर्जत तालुक्यासह इतर अनेक ठिकाणाचे भावीक हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन भक्तिभावाने न्हावून निघतात. रथयात्रेमध्ये हजारो अबालवृद्ध भाविक सहभागी होत असल्याने रथयात्रेमध्ये शांतता, सुव्यवस्था राहणे अत्यंत आवश्यक असते.
तीव्र भावना कर्जत येथील मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व इतर राजकारण्याविषयी सकल मराठा समाजाच्या आहेत. कर्जत रथयात्रेमध्ये तालुक्याबाहेरील काही लोकप्रतिनिधी व राजकीय नेते दरवर्षी सहभागी होत असतात. त्या सर्व राजकिय लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांविषयी रथ यात्रेमध्ये सहभागी होण्याबाबत सकल मराठा भावना अत्यंत तीव्र आहेत. तरी संत गोदड महाराज रथयात्रेमध्ये लोकप्रतिनिधी व तालुक्याबाहेरील कोणत्याही राजकीय नेत्यांनी सहभागी न होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्‍न निर्माण होणार नाही. असे निवेदन सकल मराठा समाज कर्जत तालुका यांचेवतीने करण्यात आले आहे.