Breaking News

महाराष्ट्रातील केबल, इंटरनेट चालकांना सोबत घेऊनच वाटचाल करा - राज ठाकरे


मुंबई : जिओ कंपनीने महाराष्ट्रातील केबल चालक, मालक यांच्या व्यवसायावर गदा येईल, असे कोणतेही धोरण राबवू नये. या केबल, इंटरनेट चालक, मालकांना सोबत घेऊनच पुढील वाटचाल करावी, असा 'सौम्य' शब्दातील इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील केबल, इंटरनेट चालक, मालक आणि त्यांचा कर्मचारी वर्ग यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे उभी आहे, याची ग्वाही मी देत असल्याचे पत्र राज ठाकरे यांनी काढले आहे.. जिओ फोनला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर मुकेश अंबानी यांनी जिओ गिगा टीव्ही आणि जिओ गिगा फायबरच्या माध्यमातून डीटीएच केबल आणि होम इंटरनेट या क्षेत्रात देखील पाऊल टाकले आहे. येत्या १५ ऑगस्टपासून याचे बुकिंग सुरू होणार आहे. याचे प्लॅन्स अगदी पाचशे रुपयांपासून सुरू होणार आहेत. घरातील केबल चॅनल व इंटरनेट सुविधा या माध्यमातून देण्यात येणार आहे. जिओ फायबर महिना ५०० रुपयांत ५० एमबीपीएसच्या स्पीडने ३०० जीबी डेटा देणार आहे, तर जिओ गिगा टीव्हीच्या माध्यमातून हाय स्पीड ब्रॉडबँड स्व्हिहस देण्यात येणार आहे. या प्लॅन्समुळे स्थानिक केबल, इंटरनेट चालकांच्या मनातील धाकधूक वाढली आहे