Breaking News

सैन्य दलातील आजी माजी सैनिकांना ग्रामपंचायत सर्व कर माफ करणार


बेलपिंपळगाव प्रतिनिधी -
नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे उपसरपंच दिपक चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती . यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली. यावेळी उपसरपंच दिपक चौगुले यांनी गावातील सैन्य दलात कार्यरत असलेल्या व सेवा निवृत्त सैनिक यांना ग्रामपंचायत घरपट्टी , पाणी पट्टी माफ करणार असुन त्यांना यापुढं हे कोणतेच कर भरावा लागणार नाही ही घोषणा करण्यात आली. 14 व्या वित्त आयोगातून अनेक विकास कामाला मंजुरी देण्यात आली. यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्य रवींद्र शेरकर यांनी नागरिकांना पंचायत समितीतर्फे कोणकोणते लाभ होईल याची माहिती दिली. गावातील सर्व पुढारी यांनी गावाच्या विकास कामाच्या बाबतीत पक्ष वाद सोडून गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन मदत केली तर गावाचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल. अशी अपेक्षा व्यक्त केली. या ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी यांना मात्र अनेकांनी धारेवर धरले. नागरिकांनी यावेळी गावातील अनेक विकास काम बाकी असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मत मांडले. या ग्रामसभेला फक्त उपसरपंच दिपक चौगुले व सदस्य विलास शिंदे हे दोघच उपस्थित होते बाकीच्या सदस्यांनी मात्र या ग्रामसभेकडे पाठ फिरवली यावरून गोंधळ उडाला होता. जे सदस्य उपस्थित नव्हते त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले. सभा संपल्यावर काही सदस्य याना विचारले असता त्यांनी सांगितले की सरपंच व ग्रामविकास अधिकारी हे विश्‍वासात घेत नाही म्हणून या ग्रामसभे कडे पाठफिरवल्याचे सांगितले.
या ग्रामसभेसाठी तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब शिंदे ,उपाध्यक्ष सुभाष साठे ,सोसायटी चेअरमन अशोक शिंदे,सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गटकळ ,पंचायत समिती सदस्य रवींद्र शेरकर, माजी सरपंच राजेंद्र साठे, बाळासाहेब शिंदे, अण्णासाहेब वैद्य, दिलीप कदम, दत्तात्रय राऊत ,सुखदेव कदम, माजी सरपंच राजेंद्र सुरसे, विलास शिंदे, राजेंद्र सुरसे,मोहन पवार, राहुल शिंदे, हर्षवर्धन शिंदे, प्रशांत साळुंके, अमोल कोकणे, गणेश शिंदे, किशोर गारुळे ,भीमजी साठे,बाळासाहेब भद्रे, पोलीस पाटील संजय साठे, सचिन जाधव, बाळासाहेब पुंड, अशोक कनगरे, बाळासाहेब शेंडगे, राजेंद्र शेरकर, प्रभाकर चौगुले, प्रकाश शेरकर,भाऊसाहेब शिंदे,संजय शिंदे,ज्ञानेश्‍वर गटकळ,कचरू कांगुणे,रेवनाथ कांगुणे, पाठबंधारे अधिकारी,पशु सेवक ,मुख्याध्यापक यासह अनेक नागरिक संख्येने उपस्थित होते. शेवटी तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले