ट्रकच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू


श्रीगोंदा / प्रतिनिधी
तालुक्यातील नगर-दौंड मार्गावर घारगाव शिवारात पेट्रोल पंपासमोर सकाळी 11 वा. च्या सुमारास विनायक रंधवे (यवत ता. दौंड जि. पुणे ) हे त्यांचे नातेवाईकांकड़े पांढरेवाड़ी (कोळगाव) येथे जात असताना, त्यांच्या पाठीमागून नगरकड़े जात असणारा ट्रक क्रमांक यूपी 93 बीटी 4798 या गाडिने माग़ुन येऊन जोराची धड़क होवून मोठा अपघात झाला. या अपघातात मोटर सायकल क्रमांक एम.एच 42, ए.व्ही 2004 या गाडीवरिल ठकुबाई विनायक रंधवे यांचा जागीच मृत्यू झाला, तर विनायक रंधवे गंभीर जख्मी झाले. अपघात झाल्यावर ट्रक ड्राइव्हर पळून गेला. या अपघाताची माहिती बेलवंडी पोलीस ठाण्यात संमजताच पोलीस निरक्षक साहेबराव पड़वळ यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. या बाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातामधील ट्रक बेलवंडी ठाण्यात जप्त केला असून, पुढील तपास पोलीस हवलदार माऊली पठारे करीत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget