काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचे निधन


मुंबई/नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचे आज (बुधवारी) सकाळी निधन झाले. वयाच्या 63व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.चाणक्यपुरीतील प्रिमास रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईमध्ये काँग्रेसला मोठं करण्यासाठी गुरुदास कामत यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या निधनाने काँग्रेसने महाराष्ट्रातील एक मोठा नेता गमवला आहे.

युवक काँग्रेस अध्यक्ष, मुंबई काँग्रेस अध्यक्ष, केंद्रीय मंत्री अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदा-या गुरूदास कामत यांनी पार पाडल्या आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. गांधी घराण्याचे निष्ठावान म्हणूनही त्यांना ओळखले जात होते. पक्ष वाढवण्यात त्यांनी मोलाची भूमीका होती. मात्र, शिवसेनेतून आलेले संजय निरूपम यांना दिले जाणारे महत्त्व आणि पक्षाच्या कार्यक्रमापासून जाणीवपूर्वक दूर ठेवल्यामुळे त्यांच्या मनात डावलल्याची भावना होती.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget