Breaking News

पारितोषिका पेक्षा स्पर्धेतील सहभागामुळे स्वतःचा व छायाचित्रण कलेकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन प्राप्त होतो.

छायाचित्रण करताना विषयाला अनुसरून व हवे ते टिपण्यासाठी स्वतःच्या कल्पनाशक्तीचा वापर आजच्या काळात गरजेचे आहेच. कारण तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी तुमच्यातील कला व संवेदनाच तुम्हाला उत्कृष्ठ छायाचित्रकार बनवते .त्याच प्रमाणे पारितोषिका पेक्षा स्पर्धेतील सहभागामुळे स्वतःचा व छायाचित्रण कलेकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन प्राप्त होतो,असे मत मुंबईचे प्रसिद्ध छायाचित्रकार व मार्गदर्शक श्री.पराग शिंदे यांनी मालेगाव येथे व्यक्त केले.

जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून मालेगाव फोटोग्राफर असो.आयोजित राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेत नगरच्या संदीप कांबळे व नितीन केदारी यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. स्पर्धेचे परीक्षक व उत्कृष्ठ छायाचित्रकार मार्गदर्शक श्री. पराग शिंदे यांच्या हस्ते नेचर विभागात संदीप कांबळे यांना तर पोट्रेट विभागात नितीन केदारी यांना पारितोषिक व ट्रॉफी देण्यात आली. यावेळी असो.चे अध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष किरण सोनावणे, सचिव सुरेश सोनावणे, खजिनदार किशोर दाभाडे, गोकुळ दास्ताने उपस्थित होते.

छायाचित्रकार म्हणून नव्यानेच पदार्पण केलेल्या संदीप कांबळे यांनी प्राप्त केलेल्या पारितोषिकामुळे ते भारावून गेले.नगरमधील कांबळे व केदारी यांनी मिळविलेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.