Breaking News

जिल्हास्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेस युवक-युवतींचा उत्सफुर्त प्रतिसाद


अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवा समिती व युवान यांच्या संयुक्त विद्यमाने पेमराज सारडा महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला जिल्ह्यातील महाविद्यालयीन युवक-युवतींचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.
11 सप्टेंबर 1983 रोजी अमेरीकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणाला यावर्षी 125 वर्ष पुर्ण होत आहे. या पार्श्‍वभुमीवर स्वामी विवेकानंदांचे विचार युवकांमध्ये रुजून सक्षम युवापिढी निर्माण होण्याच्या हेतूने या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ.अरुण मांडे, शिवराज आनंदकर, सेवा समितीचे अध्यक्ष शेखर देव, सचिव सुनिल होरणे, युवानचे संस्थापक संदिप कुसळकर, सचिव सुरेश मैड, सुनिता जामगावकर, धनंजय विभुती, मच्छिंद्र कातोरे, विराज आहुजा, मधुवंती शिवगुंडे आदि उपस्थित होते.
सुनिल होरणे यांनी श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवा समितीच्या वतीने दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे स्विकारण्यात आलेले पालकत्व, आपत्तीग्रस्तांना मदत व चालविण्यात येणार्‍या विविध प्रकल्पासह सामाजिक व अध्यात्मिक कार्याची माहिती दिली. संदिप कुसळकर यांनी गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य करुन, युवकांना स्वावलंबी व शासकीय सेवेत दाखल होण्यासाठी चालू असलेल्या युवानच्या उपक्रमाची माहिती दिली.
सदर स्पर्धा दोन गटात झाली. कनिष्ठ महाविद्यालय गटासाठी स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील घटना तर वरिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी माझी प्रेरणा स्वामी विवेकानंद हे विषय देण्यात आले होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पेमराज सारडा महाविद्यालय, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धेचे परिक्षण डॉ.अरुण मांडे, शिवराज आनंदकर, सुनिता जामगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मानसी आहुजा यांनी केले. या उपक्रमास रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी हे होते.