Breaking News

आरक्षण देणारच आहात, तर भरती का रद्द केली अशोक चव्हाणांचा फडणवीसांना सवाल

नांदेड - सरकार आरक्षण देण्यास उशीर करत असल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यातूनच हिना गावित यांच्या कारवर हल्ला झाला आहे. हा प्रकार निंदनीय असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मराठा आरक्षण आणि हिना गावित यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यासह मेगाभरती स्थगिती संदर्भात सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल केलेल्या निवेदनावर अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे. आरक्षणाच्या विषयावर काँग्रेस कुठलीही कुरघोडी करत नसल्याचे ते म्हणाले. आरक्षणाच्या मुद्द्यावर मेगा भरती स्थगित करत असल्याची घोषणा काल मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यावर चव्हाण यांनी जोरदार टीका केली केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देणारच आहात तर भरती रद्द करण्याची गरजच काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.