Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बुथ मेळावा


घोटण (प्रतिनिधी)
शेवगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने युवक काँग्रेसचा बुथ मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कोळगे यांनी आपल्या भाषणातून केले. यावेळी संजय वडते, संजय शिंदे, चेडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ क्षितिज घुले यांनी सरकारने युवकांना रोजगार उपलब्ध करण्याच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. बोंडअळी नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरून देखील खरपूस समाचार घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्रामजी कोते यांनी आपल्या भाषणातून सरकारवर निशाणा साधत भाजप सरकार हे केवळ भूलथापी सरकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजिलेल्या गावोगावी बुथ कमिटी स्थापनेतून प्रत्येक गावातील व्यक्तीशी पक्षाचे ध्येय धोरणे सांगणे लोकांना येणार्‍या अडचणी सोडवण्याचे आवाहन युवकांना केले आहे. गावा गावातील नागरिक आणि त्यांना जोडणारा दुवा म्हणजे बूथ कमिटी होय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले मा.आ. नरेंद्र घुले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील , जिल्हा युवा अध्यक्ष कपिल पवार, स्वप्निल घुले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते काकासाहेब नरोडे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे ,शेवगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास नेमाने, अरुण लांडे, संजय फडके, नगरसेवक सागर फडके, संजय शिंदे, आtणि पंडितराव भोसले आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.