दिल्ली-मुंबई हरित महामार्गाचे भूमी अधिग्रहण डिसेंबरपर्यंत - केंद्रीय मंत्री नितीन गडकरीनवी दिल्ली : भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने सुरु केलेल्या ‘भूमी राशी’पोर्टलमुळे दिल्ली-मुंबई हरित महामार्गाच्या भूमी अधिग्रहणाच्या कामाला गती येईल व यावर्षी डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

परिवहन भवन येथे आज श्री. गडकरी यांच्या हस्ते ‘भूमी राशी’ आणि‘पीएफएमएस लिंकेज’ या भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय व राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पोर्टलचे उद्घाटन झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री. गडकरी बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडविया, सचिव युधवीरसिंह मलिक यावेळी मंचावर उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget