Breaking News

माजी केंद्रीयमंत्री गुरुदास कामत यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार मल्लिकार्जुन खरगे, आमदार सरदार तारासिंह, भाई जगताप, प्रसाद लाड, नसीम खान, जनार्दन चांदूरकर, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, संजय निरुपम आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कामत यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.