Breaking News

नागपूर येथील ग्रीन बसेसच्या अडचणी लवकरच दूर होणारनागपूर येथील ग्रीन बसच्या परिचालनात येणाऱ्या अडचणींबाबत श्री. गडकरी यांच्या अध्यक्षतेत चर्चा झाली. स्वीडनचे राजदूत क्लास मोलीस, नागपूरचे आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, नागपूर महानगर पालिकेचे परिवहन सभापती बंटी कुकडे , नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत ग्रीन बसच्या परिचलनातील विविध अडचणींबाबत चर्चा झाली व मार्गही काढण्यात आला. तसेच, नागपूरतील वाडी परिसरातील ६ एकर जमीन आणि खापरी परिसरातील ९ एकर जमिनीवर ‘बांधा,वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वावर बस पोर्ट तयार करण्यात येणार असल्याचे श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले