Breaking News

झेंडीगेट येथील नागरिकांच्या वतीने हज यात्रेकरुंना निरोप


अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते अमीर सय्यद त्यांच्या मातोश्रीसह हज यात्रेला जात असताना झेंडीगेट येथील नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करुन यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष हाजी मन्सूर शेख, एजाज सय्यद, जीया सय्यद, साहेबान जहागीरदार, अजमत इराणी, मोहसीन अड्डेवाले, तन्वीर मिर्झा, हाजी अस्लम, हमजा शेख आदी उपस्थित होते. त्यांच्या कुटुंबीयांचे सहा सदस्य हज यात्रेसाठी रवाना होत आहे. अमीर सय्यद हे सामाजिक कार्यकर्ते असून, दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत औषधे ते पुरवित असतात. शहरातील एकता, अखंडता व सुख-समृध्दीसाठी प्रार्थना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.