Breaking News

गैरहजर बीएलओंची निवडणूक शाखेत हजेरी


अहमदनगर/ प्रतिनिधी 

श्रीगोंदा तालुक्यातील आयोजित बीएलओंची बैठक (शुक्रवारी) पार पडली. यावेळी 7 बीएलओ गैरहजर होते. त्याचे रिपोर्टींग तहसीलदारांनी केले असता, 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या तयार करणे व निवडणूक विषयक कामात टाळाटाळ व हलगर्जीपणा करणार्‍या श्रीगोंदा तालुक्यातील सात बीएलओंना उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक शाखेत सर्व कागदपत्रासह हजेरी देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी हजेरी लावली असता त्यांच्या सर्व नोंद वह्या, आजपर्यंत बीएलओ यांनी केलेली मतदार नोंदणी, मयत, दुबार व स्थलांतरीत अशा मतदारांची केलेली वगळणी, आजपर्यंत वाटप केलेले निवडणूक मतदार फोटो ओळखपत्र (एपिक), फोटो नसलेल्या मतदारांचे जमा केलेले फोटो तसेच कृष्ण धवल फोटो असलेल्या मतदारांचे जमा केलेले रंगीत फोटो यांसह संपूर्ण कामाकाजाची तपासणी यावेळी करण्यात आली.

श्रीगोंदा तालुक्यातील आयोजित बीएलओ बैठकित राजू तुकाराम विधाते, सुरेखा सावळेराम शेळके, दादासाहेब पांडुरंग कोल्हे, राजू राऊत, ए.सी झेंडे, व्ही.एस.शिंदे हे गैरहजर होते. गैरहजर बीएलओ (केंद्रस्तरीय अधिकारी) वर कार्यवाही करण्याचे आदेश उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांना दिले होते. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली.