आईच्या मायेने शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर संस्कार करावेत -मीनाताई जगधने


अहमदनगर (प्रतिनिधी)- आईच्या मायेने शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर संस्कार करावेत. शाळेत येणार्‍या प्रत्येक मुलांची अडचणी शिक्षकांनी समजावून घ्याव्यात. विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधल्यास त्यांची शाळेची भिती दूर होऊन शिक्षणाची आवड त्यांच्यात निर्माण होणार असल्याची भावना मीनाताई जगधने यांनी व्यक्त केली.
रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाच्या वतीने प्राथमिक आणि बालवाडीच्या मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटना प्रसंगी जगधने बोलत होत्या. विद्यार्थी व शिक्षकांमध्ये मैत्रीपुर्ण नाते निर्माण होण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बुरुडगाव रोड येथील संस्थेच्या कार्यालयात झालेल्या या कार्यशाळेस शिक्षकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या अंगी संस्काराची रुजवण प्राथमिक शिक्षक करीत असतात. प्राथमिक शिक्षण विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याचा पाया आहे. विद्यार्थ्यांचा अपमान होईल असे बोलणे शिक्षकांनी टाळावे. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकता व शिक्षणावर होतो. यामुळे अनेक मुले शाळाबाह्य होतात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्‍न आपुलकीने सोडविण्याचा सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला.
प्रास्ताविकातइन्स्पेक्टर संजय नागपुरे यांनी कार्यशाळेचे महत्व विशद करुन, या उपक्रमाची माहिती दिली. कलाशिक्षक विनायक सापा यांनी कार्यनुभव विषयाचे मार्गदर्शन करून, घडीकाम, कागदकाम, चित्र, शिल्प याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच शिक्षकांकडून विविध कलाकृती यावेळी करून घेतल्या. कार्यशाळेच्या दुपार सत्रात रामकृष्ण फाउंडेशन इंग्लीश मिडीयमच्या प्राचार्या गीता गिल्डा यांनी शिक्षक, विद्यार्थी अंतरक्रिया या विषयावर मार्गदर्शन करुन अध्यापन पध्दतीसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करण्याविषयी माहिती दिली. तसेच शिक्षकांच्या विविध शंकेचे निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व नियोजन मुख्यध्यापक शिवाजी लंके यांनी केले. यावेळी सहा. इन्स्पेक्टर के.के. शेंडगे, बी.बी. सरदार, संस्था कार्यालयातील महेश पाटील, राजनारायण पांडुळे, मुंढे सर आदींसह शिक्षक उपस्थित होते. आभार के.के शेंडगे यांनी मानले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget