जवळा येथे दोनशे आंदोलनकर्त्यांनी मुंडन करून आंदोलन


जामखेड / ता. प्रतिनिधी 
सरकारकडे मराठा आरक्षणाची मागणी करुनही शासन गेल्या दोन वर्षांपासून आरक्षणा बाबत गांभीर्याने दखल घेत नसल्याने क्रांती दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर गुरूवारी जामखेड तालुक्यातील नान्नज, खर्डा, अरणगाव, जवळा या ठिकाणी कडकडीत बंद पाळून चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
सकाळ पासुनच जामखेड तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच चक्काजाम आंदोलनामुळे एकही वाहन रस्त्यावर दिसले नाही. तालुक्यातील बस सेवा पूर्णपणे ठप्प असल्याने बसस्थानक आणि रस्त्यांवर ही वाहने नसल्याने शुकशुकाट जाणवत होता. . 
तालुक्यातील जवळा येथे मराठा आरक्षण संबंधी दोनशे आंदोलनकर्त्यांनी मुंडण करुन आंदोलन केले. तसेच गावातून फेरी काढतानाच जामखेड - करमाळा रस्त्यावर रास्तारोको करतानाच चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामध्ये हजारो मराठा बांधव सहभागी झाले. यामध्ये सभापती सुभाष आव्हाड, ज्योती क्रांती पतसंस्थेचे अध्यक्ष आजीनाथ हजारे, प्रशांत पाटील, प्रदिप दळवी, प्रदिप पाटील, सुरेश पठाडे, शहाजी पाटील, अनिल पवार, उपसरपंच गौतम कोल्हे, दयानंद कथले, शरद हजारे, प्रशांत शिंदे, उमेश रोडे, अशोक पठाडे, नारायण आयकर, राहूल पाटील, बंडु कोल्हे, असलम शेख, महादेव वाळुंजकर, शब्बीर सय्यद याबरोबरच आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष अमजद पठाण, बाजार समिती संचालक तुषार पवार, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले, पृथ्वीराज वाळुंजकर, जालिंदर खोटे, भारत काकडे, बबन ठकाण, जालिंदर चव्हाण, रासपाचे नितीन हुलगुंडे, विकास मासाळ यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवळा येथे झालेल्या चक्काजाम आंदोलनात जवळा गावासह नान्नज, हाळगाव, चोंडी, जवळका, आळजापूर, मतेवाडी, गोयकरवाडी, खुंटेवाडी, मुंजेवाडी, बोर्ले, पिंपरखेड, जवळा हळगाव येथील मराठा समाज बांधव जवळा येथे आंदोलनात सहभागी झाले. अरणगाव या ठिकाणी देखील गाव बंद ठेऊन चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाजाच्या आंदोलनास चौंडी येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे यांच्यासह धनगर समाजाने पाठिंबा दिला. तसेच मुस्लीम समाज संघटना, वीरशैव लिंगायत समाज संघटना, कोल्हाटी समाज, या संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होवून पाठिंबा दिला. मेडीकल असोसिएशन, डॉक्टर संघटना व जामखेड वकील संघाने आपले एक दिवसाचे कामकाज ठप्प ठेऊन पाठींबा दिला. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget